जळगाव (प्रतिनिधी) पीक विम्याची रकम आली असून परिपत्रकानुसार कर्जदार शेतकऱ्यांची पीक विम्याची रकम कर्जात जमा करण्याचा निर्णय होता.
परंतु शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार जिल्हा बँकने पीक विम्याची रक्कम कर्जात न भरता त्यांच्या खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांवरील अर्थिक संकट पाहता हा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. हवामान अधारीत फळपीक विम्याची रक्कम जळगाव जिल्हा ३७५ कोटी रुपये प्राप्त झाली असून परिपत्रक रद्द करून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या बैंक सेव्हींग खात्यात रकम जमा होणार आहे बैंक मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात रकम जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून काही तांत्रिक अडचणीमुळे काम संथ गतीने सुरु असून लवकरच रक्कम शेतकयांच्या खात्यात जमा होणार आहे. असे जिल्हा बैंक मार्फत सांगण्यात आले.