मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती वाढू लागल्या आहेत. आज पुन्हा एकदा त्यात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहचले आहेत. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत बदल केलेला नाही.
आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 119.8 डॉलर होती, तर WTI प्रति बॅरल 115.6 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या दबावाखालीही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई – पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर
दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर