जळगाव (प्रतिनिधी) सध्याची मुले अगदी लहान वयापासून मोबाईलशी खेळताना दिसतात, सोशल मीडियावर ऑनलाईन असतात. पण यामुळे त्यांच्या अंगभूत गुणांकडे कमालीचे दुर्लक्ष होते. त्याच्या अगदी उलट गुंजन सावंत यांनी अत्यंत कमी वयात स्केच ड्रॉईंग रेखाटून त्याचे प्रदर्शन भरविले, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवकर यांच्यासह, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राप महामंडळ व्यवस्थापिका नीलिमा बागुल, संदीप पोतदार, गुंजनचे मार्गदर्शक तरुण भाटे यांची उपस्थिती होती. शहरातील बहिणाबाई उद्यान जवळील पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे हे प्रदर्शन आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे, 3 ते 15 सकाळी 11 ते सायंकाळी सातपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी गुंजन प्रसाद सावंत यांच्यासह भूविकास बँकेचे निवृत्त कर्मचारी व गुंजनचे आजोबा भीमराव सावंत, बाळासाहेब पाटील (आमोदे), चंदू पाटील, धीरज पाटील, कुंदन सावंत, डॉ. नितीन वसंतराव पाटील, गुंजनचे वडील प्रसाद सावंत अनिल पाटील, डॉ. समनपुरे यांच्यासह चमगाव व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.