जळगाव (प्रतिनिधी) वडिलांच्या नावावर असलेली विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम देण्याच्या नावाखाली एकाची पावणे अकरा लाख रुपयांची फसवणूक केली होती. फसवणुक करणाऱ्या मोंटू कुमार खेमचंद (वय ३६, रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) याच्या सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातून मुसक्या आवळल्या. या फसवणुकीमध्ये रक्कम स्वीकारण्यासाठी विविध राज्यांतील बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
भुसावळ येथे रेल्वेमध्ये नोकरीला असलेल्या तक्रारदाराची त्याच्या वडीलांच्या नावाने असलेली विम्याचे ४४ लाख रुपये देण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्रे पाठवून १० लाख ७४ हजार १९४ रुपयांमध्ये फसवणूक केली होती. सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्या बँक खात्यांची तांत्रिक विश्लेषणाद्वारे सायबर पोलिसांनी माहिती मिळविली. यात मोंटू कुमार खेमचंद हा सीएसपी सेंटरमधून वेळोवेळी रोख स्वरुपात रक्कम काढायच आणि पुढे इतर साथीदारांच्या बँक खात्यात ती जमा करत असल्याच उघड झाले.
गाजियाबादहून आवळल्या मुसक्या
पोलिसांनी मोंटू कुमार खेमचंद याची सर्व कुंडली काढून पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, पोकों हारुण पिंजारी, पोकॉ गौरव पाटील, मिलिंद जाधव यांनी गाजियाबादहून मोंटूला अटक केली.