अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा. शि. मंडळाच्या डी. आर. कन्याशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. के. सोनवणे, उपमुख्याध्यापक डी. एच. ठाकुर, पर्यवेक्षिका के. ए. गरुड, पर्यवेक्षक सी. एस. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते.