नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंडियानापोलिस येथील एका फर्टिलिटी सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरचं (Dr. Donald Klein) काळं कृत्य समोर आलं आहे. हा डॉक्टर एक दोन एक दोन नव्हे तर तब्बल ९४ मुलांचा बाप (father of 94 boys) निघाला आहे. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा या डॉक्टरवर डॉक्युमेंटरी तयार झाली.
माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील इंडियानापोलिस येथील आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड क्लाइन असं या डॉक्टरचं नाव आहे. डॉ. डोनाल्ड क्लाइन यांच्या सत्यकथेला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेटफ्लिक्सने ‘Our Father’ नावाचा माहितीपट बनवला आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तो आपले स्पर्म टाकत असे. हे सर्व तो रुग्णांना बेशुद्ध केल्यानंतर करत असे. हा डॉक्टर महिला रुग्णांना न सांगता असं काम करायचा.
धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरचे हे कारनामे त्याची मुलगी जेकोबा बेलाद हिने प्रथम उघड केले. तिचा जन्म शुक्राणू दानातून झाला होता. एके दिवशी तिने घरीच डीएनए चाचणी केली. ज्यामध्ये तिला या डॉक्टरपासून झालेले आणखी सात भावंडे असल्याचे समोर आले. पण धक्कादायक म्हणजे या सर्वांची आई वेगवेगळी होती. त्यानंतर या सातही जणांनी मिळून आपल्या परिवाराचा पसारा कळण्यासाठी शोध सुरु केला. त्यात त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या फॅमिली डॉक्टर त्याचे स्पर्म्स महिला रुग्णांच्या शरिरात टाकतो आहे. या डॉक्युमेंट्रीत जैकोबा यांनी याबाबत सविस्तरपणे सांगितलेले आहे.
मैट यांची आई म्हणते– जेव्हा मैटची डीएनए चाचणी झाली. तेव्हा माझ्या तोंडातून पहिल्यांदा आलेले शब्द होते की माझ्यावर 15 वेळा बलात्कार झाला, आणि मला हे समजलेच नाही. डॉक्टर क्लाईन जेव्हा आपल्यावर उपचार करीत असे तेव्हा तो दवाखान्यात एकटाच असे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर कायद्यानुसार क्लाईन याला कोर्टात नेण्यात आले. तेव्हाच्या कायद्यातील तरतुदीनुसार, याबाबत गुन्हेगारी कायद्याची तेव्हा तरतूद नव्हती. त्यानंतर केवळ 40 हजारांचा दंड भरुन त्याची सुटका करण्यात आली होती.