TheClearNews.Com
Saturday, June 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर युवराज रायपूरकर यांची हरकत !

राजकीय दबावाला बळी पडून प्रभाग रचना केल्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करतांना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली असल्याचा आरोप करत युवराज भास्कर रायपूरकर यांनी हरकत घेतली आहे. सदर रचना त्रयस्त यंत्रणेमार्फत उप जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा खाली सदरची प्रभाग रचना तयार करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

युवराज भास्कर रायपूरकर यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग रचना तयार करतांना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. ज्यात सत्ताधारी गटाने स्वतःच्या राजकीय फायद्याच्या दृष्टीने सोयीची अशी प्रभाग रचना बनवून घेतलेली असल्याचा माझा स्पष्ट आक्षेप आहे सदरची प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी गटाने स्वतःच्या सोयीनुसार सदर प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे ती चुकीची व बेकायदेशीर अशी आहे. २. प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार करतांना कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ५ नोटीस बोडॉवर दर्शविण्यात आलेला नाही. त्याची सत्यप्रत देण्यात यावी. हरकत व सुचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना स्विकारण्याची व्यवस्था नगरपालिका कार्यालयात करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना पोच पावती देताना दिनांक व वेळ नमूद करण्यात यावे. हरकती व सुचनांना क्रमांक देण्यात यावेत, अशी कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही.

प्रभाग रचनेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. यासंदर्भात भौगोलिक स्थिती तथा सामाजिक गणना याचा विचार न केल्याने अनेक वस्त्यांचे विभाजन झालेले आहे. ते खालीलप्रमाणे

अ) समाजानुसार भाग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाश्यात दाखविण्यात आलेले नाहीत, असे कि, लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा, हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर ज्याने या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.

आ) विविध समाजाचा माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज, दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो.

इ) प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची सूची दिल्यास मुस्लीम समाज कश्याप्रकारे विभागाला गेला आहे हे स्पष्टपणे दिसून येईल प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आलेला नाही.

उदाहरण प्रभाग क्रमांक ११ हा बनविताना राष्ट्रीय महामार्ग ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आलेला आहे.

तरी वरील सर्व परिस्थिती पाहता राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आलेली असून सदर रचना हि त्रयस्त यंत्रणेमार्फत म.उप जिल्हाधिकारी सो. स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा खाली सदरची प्रभाग रचना तयार करण्यात यावी, असंही हरकतीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
Next Post

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दिलीप माळी यांची हरकत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : सेवानिवृत्त शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले दोन लाख !

October 11, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 24, 2025

प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन, वायफळ बडबडी पेक्षा प्रत्यक्ष कामावर भर ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना टोला !

March 27, 2023

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group