TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दिलीप माळी यांची हरकत !

भौगोलिक स्थिती तथा सामाजिक गणनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली असल्याचा आरोप करत दिलीप श्रावण माळी यांनी हरकत घेतली आहे. सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

दिलीप श्रावण माळी (वाणी गल्ली, धरणगाव) यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. ज्यात सत्ताधारी गटाने स्वतःच्या राजकीय फायदयाच्या दृष्टीने सोयीची अशी प्रभाग रचना बनवून घेतलेली असल्याचा माझा स्पष्ट आक्षेप आहे सदरची प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी गटाने स्वतःच्या सोयीनुसार सदर प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे ती चुकीची व बेकायदेशीर अशी आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार करतांना कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ७ नोटीस बोर्डावर दर्शविण्यात आलेला नाही. त्याची सत्यप्रत देण्यात यावी

हरकत व सुचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना स्विकारण्याची व्यवस्था नगरपालिका कार्यालयात करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना पोच पावती देतांना दिनांक व वेळ नमूद करण्यात यावे हरकती व सुचनांना क्रमांक देण्यात यावेत अशी कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही. प्रत्येक प्रभागात हेतुपुरस्कर मुस्लीम वस्ती, गरीब वस्ती (स्लम एरिया) सामाईकरित्या विभागून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जेणेकरून या गोर गरीब व गरजू लोकांना पैश्यांचे आमिष दाखवून निवडणुकीत सत्ताधारी गटाला प्रभाव टाकता.

सदरची प्रभाग रचना ही गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली नाही तसेच प्रत्येक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी केलेली नाही. तसेच सदरची रचना निरपेक्ष व निष्पक्षपणे केलेली नाही. सदरच्या प्रभाग रचनेत एका विशिष्ट समुदायाचे म्हणजेच मुस्लीम समुदायाचे विभागीकरण प्रत्येक प्रभागात केलेले दिसून येते. त्यामुळे सदरची प्रभाग रचना ही जातीविरहित व निष्पक्ष अशी नाही.

सदरची प्रभाग रचना करतांना विद्यमान नगरसेवक व सत्ताधारी पक्ष निवडून येईल अशा पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सदर प्रभाग रचना ही निष्पक्ष नाही तसेच सदरची प्रभाग रचना ही भारतीय निवडणूक कायदा यांच्या तरतुदीना अनुसरून अशी नाही. तसेच सदरची प्रभाग रचना करताना निवडणूक कायद्याचा, नियम व नियमावलीचा कुठलाही अवलंब न करता सत्ताधारी पक्षाच्या सोयीनुसार प्रभाग रचना केलेली आहे.

प्रभाग रचना करतांना राज्य निवडणूक आयोगाने जून २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेले कुठलेही नियमांचा अवलंब केला गेलेला नाही. सदर प्रभाग रचना ही सदर जून २०१५ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने जून २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करून व सर्व नियम धाब्यावर बसवून सदरची प्रभाग रचना केलेली असल्याने त्यास माझी तीव्र हरकत आहे. सध्या गुगलमध्ये समाविष्ट असलेले बरेचसे भाग नकाशात दिसून येत नहीत. त्यामुळे गुगलच्या नव्याने तयार असलेल्या नकाशाचा वापर केल्याचे दिसून येत नाही.

प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लाय ओव्हर इत्यादींचा विचार न करता सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. यासंदर्भात भौगोलिक स्थिती तथा सामाजिक गणना याचा विचार न केल्याने अनेक वस्त्यांचे विभाजन झालेले आहे. ते खालीलप्रमाणे :

अ) समाजानुसार भाग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाश्यात दाखविण्यात आलेले नहीत. जसे कि, लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा, हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर ज्याने या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही. जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.

आ) विविध समाजाचा माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज,दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो.

इ) प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची सूची दिल्यास मुस्लीम समाज कश्याप्रकारे विभागाला गेला आहे हे स्पष्टपणे दिसून येईल प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आलेला नाही.

उदाहरण: प्रभाग क्रमांक ११ हा बनवितांना राष्ट्रीय महामार्ग ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरी वरील सर्व परिस्थिती पाहता राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आलेली असून सदर रचना हि त्रयस्त यंत्रणेमार्फत म.उप जिल्हाधिकारी सो. स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा खाली सदरची प्रभाग रचना तयार करण्यात यावी, असे हरकतीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

पाचोरा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे : दिलीप तिवारी

March 3, 2021

उद्धव ठाकरे आमचे नेते ; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही : दीपक केसरकर 

July 2, 2022

श्रीलंकेत फक्त एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल ; पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची माहिती

May 17, 2022

Marine Combat Veteran Kills 12 In Crowded California Bar

July 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group