औरंगाबाद (वृत्तसंस्था) एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या ५ वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे, असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला आहे. अजिंठा पोलिसांनी (police) आरोपीस (Accused) ताब्यात घेतले आहे.
५ वर्षीय चिमुकली व आरोपी दोघेही शेजारी- शेजारीच राहतात. आरोपीच्या घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधून आरोपीने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीला तिच्या आई समोर शॅम्पू आणण्यासाठी बोलावले. तिने शॅम्पू आणून दिल्यावर आरोपीने घराचे दार लावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलगी किंकाळत असताना ही त्याला तिची कीव आली नाही. मुलीच्या आईला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने लगेच दार ठोठावला पण आरोपीने बराचवेळ दार उघडले नाही. मुलीला त्याच अवस्थेत सोडून मागील दारातून आरोपी पसार झाला. ती चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडून होती.
त्यानंतर मुलीचे आई- वडील व नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मुलगी व मुलाचे मेडिकल करण्यात आले आहे. त्यानंतर दोघांना पुढील मेडिकल व डीएनएसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, पोलीस निरीक्षक अजीत विसपुते,अक्रम पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.