नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वित्झर्लंडमधील २० वर्षीय तरुणाला हस्तमैथुन करताना त्याच्या फुफ्फुसांना दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेडिओलॉजी केस रिपोर्ट्सनुसार, अंथरुणावर पडून हस्तमैथुन करताना अचानक छातीत दुखू लागल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळले की तरुणाला सौम्य दम्याचा त्रास होता. रुग्णाच्या छातीच्या एक्स-रेमध्ये न्यूमोमेडियास्टिनम नावाची दुर्मिळ स्थिती असल्याचे दिसून आले. त्यामुळे या तरुणाला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता होती.
फुफ्फुस किंवा अन्ननलिकेला शारीरिक दुखापत झाल्याने न्यूमोमेडियास्टिनम होऊ शकतो. छातीच्या पोकळीत अचानक वाढलेल्या दबावामुळे फुफ्फुसाच्या काही भागाची झीज होते, ज्यामुळे हवा बाहेर पडते अशी दुखापत तरुण पुरुषांमध्ये होण्याची अधिक शक्यता असते आणि या दरम्यान दम्याचा तीव्र झटका, उलट्या याचा समावेश असतो.















