राशिभविष्य, शुक्रवार ११ मार्च २०२२ : आज फाल्गुन शुक्ल नवमी. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. चंद्राच्या या संचारामुळे मिथुन सोबतच अनेक राशींचे ग्रहतारे उन्नत होणार आहेत. आज मिथुन राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
मेष :-
तृतीय स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून घरामध्ये, जास्तीची साफसफाई, बहीण भावांची भेट असा हा दिवस आहे. प्रवास योग येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम.
वृषभ :-
आज द्वितीय चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम.
मिथुन :-
राशी स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचं राहिल. गुरुशी नवपंचम योग शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ.
कर्क :-
आज व्यय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण त्रास देणारे आहे. सप्तम मंगळ कुरबुरी सुरू ठेवेल. शनि बुध देखील मार्ग अडवतील. पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल. दिवस मध्यम आहे.
सिंह :-
राशीच्या लाभ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण संततीसाठी शुभ काळ दाखवत आहे. प्रत्येक विषयात काही तरी लाभ होईल. शांत रहा. दिवस उत्तम.
कन्या :-
आज दशम स्थानातील भ्रमण उत्तम असून घरासाठी काही विशेष खरेदी होईल. जास्तीचं काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे.
तूळ :-
कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील. दिवस बरा आहे.
वृश्चिक :-
अष्टम स्थानातील चंद्र अध्यात्मिक अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस मध्यम.
धनु :-
आज राशीसमोरील चंद्र भ्रमण आणि द्वितीय मंगळ शुक्र सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनांपासून जपा. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम.
मकर :-
आजचा दिवस जोडीदारासोबत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. श्वास विकार असतील तर काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम. .
कुंभ :-
आज संतती आनंदी राहणार आहे. मंगळ शनि व्ययात असून प्रकृती नाजूक, आर्थिक दृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल.
मीन :-
आज कार्यक्षेत्र आणि कौटुंबिक आयुष्य याला महत्त्व असेल. तुमचं नाव होईल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस शुभ असून गुरूची उपासना करावी.