बोदवड (प्रतिनिधी) शहरातील गोमाता नगर व जुना सोनोटी रस्त्यावरील रुपेश दामोदर गांधी यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा माल लंपास केला आहे. यात सोन्या,चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे.
चोरीस गेल्या मालात ७०००० रु चे चांदिचे पैजनचे 10 जोड़, १५००० रु चे चांदीचे बिचुड्या १५ जोड,२८००० रु चे चांदीचे शिक्के एकुण ३५ नग , २४००० रु चे ४ ग्रम सोन्याचे मणी, ३०००० रु ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २००० रु ३ भार वजनाची चांदीची कटोरी ,१५००० रु चे ३ ग्रॅम वजनाचे नाकातील ३ नग गुढे , ९३३०० रु रोख असलेल्या त्यामध्ये ५००, १००,५९, २०,१० च्या नोटा असा एकुण- २,७७,३०० रुपयांच्या ऐवजचा समावेश आहे.
अज्ञात चोरट्यांनी घरातून किंमती मुद्देमाल चोरुन नेला आहे. गांधी कुटुंब गेल्या चार पाच दिवस घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हात साफ केला. चोरट्यांचा माग काढण्यास श्वान पथक बोलावण्यात आले होते. पण काहीही सुगावा मिळू शकला नाही. याप्रकरणी रूपेश गांधी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.