भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी तब्बल 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात नोंद करण्यात आली.
लक्ष्मण पंडित बोरोले (65, बोरोले नगर, निंभोरा) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटूंबासह निंभोरा येथे वास्तव्यास आहेत. 1 ते 2 दरम्यान बोरोले कुटूंब बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. गोदरेज कपाटातील चार तोळे वजनाचा व 24 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे फुलपात्र मिळून 26 हजारांचा ऐवज लांबवला. दरम्यान, सोन्याच्या हारची आजच्या बाजारभावानुसार सुमारे अडीच लाखापर्यंत किंमत आहे. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.