जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री आपली जवाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. इंजेक्शनचा साठा पुरेसा उपलब्ध न झाल्याने जळगाव जिल्ह्यात ‘डेथ रेशो’ वाढला. इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असून पालकमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडावी अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप जळगाव विधानसभा प्रमुख दीपक साखरे यांनी केली आहे.
दीपक साखरे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालय एकूण ११५ आहेत. त्या रुग्णालयामध्ये आजची स्थिती अशी आहे की, ओटूवर असलेले रुग्ण हे साधारण हजारावर आहेत. तर आयसीयुमध्ये ६०० च्या आसपास रुग्ण आहेत. दुसरीकडे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या १४० च्या आसपास आहे. म्हणजे एकूण १७४० रुग्णांना दररोज रेमडीसीवर इंजेक्शनची गरज असते. त्यातील ओटूचे पेशंट सोडले तरी कमीतकमी एक हजार इंजेक्शनची जिल्ह्यात गरज आहे. असे असतानाही जिल्ह्यात गेले काही दिवसापासून ३०० ते ४०० इंजेक्शनच्यावर पुरवठा होत नाही. आज प्रशासनाने फक्त ३०० इंजेक्शन वाटप केले आहेत. यात आयसीयुचे रुग्णसुद्धा कव्हर होत नाही. तीन दिवसापूर्वी खासदार उन्मेष दादा यांच्या प्रयत्नमधून जिल्ह्यात एक हजार इंजेक्शन प्राप्त झाले, तो दिवस सोडला तर गेल्या २० दिवसात एकही दिवस इंजेक्शन पुरेसे उपलब्ध का होत नाही? पालकमंत्रीसह जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे या जिल्ह्यातील जनतेसाठी सरकारशी भांडून इंजेक्शन का उपलब्ध करुन देत नाही? याचे उत्तर द्या ? इतर वेळी भीमगर्जना करणारे पालकमंत्री भाजपाला शिव्याशाप देणारे पालकमंत्री जनतेसाठी शिंगाडे मोर्चा काढणारे आज का गप्प आहेत?, पालकमंत्री आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. इंजेक्शनचासाठा पुरेसा न उपलब्ध झाल्याने जळगाव जिल्ह्यात ‘डेथ रेशो’ वाढला. इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
याच परिस्थितीचा फायदा उचलून इंजेक्शनचा काळा बाजार सुरु झाला आहे. १२०० रुपयाचे इंजेक्शन २२ हजारात विकणारे कालच पोलिसांनी पकडले आहेत. विकणारे पकडले पण पुढील तपास मात्र थंड आहे. कारण इंजेक्शन बॅच नंबरवरून ते इंजेक्शन कोणत्या मेडिकलवरून आले ते कळेल. फक्त विकणारे पकडून उपयोग नाही, तर अशा मेडिकलवर पण धाडी टाकल्या पाहिजे. पण पुढील तपास थंड बसत्यात गेला, याचे उत्तर पालकमंत्री म्हणुन आपण द्यावे, राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या जिल्ह्यात पुरेसासाठा जातो. परंतु जळगाव जिल्ह्यावर अन्याय का? पालकमंत्री म्हणुन आपण जिल्ह्यात इंजेकशन उपलब्ध करुन द्या, अन्यथा इंजेकशन अभावी होणाऱ्या मृत्यूची जवाबदरी स्वीकारा, असा इशारा जळगाव विधानसभा प्रमुख दीपक साखरे यांनी दिला आहे.