TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले ७०,४२१ कोरोनाबाधित

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या ७२ दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ३ हजार ९२१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्या अद्याप कमी झालेली नाही. अशातही काल दिवसभरात ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७० हजार ४२१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून,१ लाख १९ हजार ५०१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३ हजार ९२१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशात सलग सातव्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ७०,४२१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आणि ३९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, आठवड्याच्या शेवटी ५३,००१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी ३० मार्च रोजी ५३,४८० रुग्णांची नोंद झाली होती.

देशात सलग ३२ व्या दिवशी कोरोना व्हायरसचे नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. १३ जनपर्यंत देशभरात २५ कोटी ४८ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १४ लाख ९९ हजार लसीचे डोसे देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास ३८ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १४.९२ लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून अधिक आहे.

राज्यातली स्थिती

राज्यात काल १०,४४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ७,५०४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल ४८३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण १,५५,५८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील १५ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर १३ ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण ५६,३९,२७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही : संभाजीराजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनगर समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

December 1, 2021

वरणगावातून दुचाकी चोरट्याला अटक, चार दुचाकी जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !

August 31, 2024

४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात !

January 3, 2024

आयुष्यात आलेल्या अपयशाचे व अडथळ्यांची संधीत रूपांतर करता आले पाहिजे : कौशल पाटील !

December 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group