जळगाव (प्रतिनिधी) कथित अधिल एसएमएस पाठविल्याप्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती दिपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कथित अधिल एसएमएस पाठविल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्यावर पुणे, नाशिक, मुंबई अशा विविध ठिकाणी महिला आमदारांनी गुन्हे दाखल केरले होते. दिपक गुप्ता यांना फसविण्यासाठी अज्ञात व्यक्तीने सदर महिला आमदारांना अधिल एसएमएस पाठविले होते. त्यामुळे २०१७ मध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गुप्ता यांना मुंबई येथे नेऊन अटक करण्यात आली होती. याप्रकरणात बेलापूर सीबीडी न्यायालय नवी मुबंईने गुप्ता यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यावर आपला संशय असल्याचा आरोपही गुप्ता यांनी केला आहे.