पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर (Social media) बदनामी करण्याविषयी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांच्या विरोधामध्ये अपशब्द आणि बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील (Pune) फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम गुंजाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. फेसबुकवर १ करोड ताईवर नाराज असणाऱ्याचा ग्रुपवर शिवीगाळ झाली होती. याविषयी सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत वक्तव्य केली जात होती. यामुळे याप्रकरणी सागर गजानन पाटील, प्रसाद राणे, ध्रुवराज ढकेडकर, राजेश दांडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस अधिकचा तपास करत आहेत.