नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच कुटुंबियांना मदतीची ग्वाही दिली. तर मी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली असून त्यांना न्याय पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात होती. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पीडितेच्या कुटुंबियांनीच हा आरोप केल्यामुळे उन्नावमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केले आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेन, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितले.