धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात विविध नागरी समस्या उफाळून आल्या आहेत. त्यामुळे धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याची मागणी धरणगाव जागृत जनमंचने केली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारींकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील धरणगाव जागृत जनमंचचे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.
धरणगाव जनजागृत मंचचे जितेंद्र महाजन यांचे म्हणणे आहे की, शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत. शहरातील नाले सफाई होत नाही. गटारी वेळोवेळी काढण्यात येत नाहीत. विविध ठिकाणची स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. तर अनेक ठिकाणी लाईट फुटलेल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही काही भागात पाणीपुरवठा उशीराने केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गटारी सदृश्य पाण्याची नागरिकांना पुरवठा करण्यात आला होता. यावरून मुख्याधिकारी यांचा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला दिसून येत नाही. एवढेच काय खुद्द मुख्याधिकारी नगरपालिकेत सापडत नाहीत. बहुतांश वेळा ते नगरपालिकेत अनुपस्थित राहतात. त्यामुळे धरणगाव शहराकडे त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही, हे स्पष्ट होत आहे.
बस स्थानका शेजारी असलेल्या पेट्रोल पंपच्या समोर कमीत कमी वर्षभरापासून पाईपलाईन फुटलेली आहे. त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर ठिकाणाहून सदर ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. महात्मा गांधी उद्यानाच्या समोर विहिरीला लागून असलेल्या गटारी जवळ गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपलाईन फुटली असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून याठिकाणी परिसरातील नागरिकांनी या संदर्भात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी तक्रार करून देखील कोणतीही तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही.
धरणगाव नगरपालिकेला वर्षानुवर्ष पाण्याची समस्या भेडसावत असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असताना मुख्याधिकाऱ्यांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा व आरोग्याच्या मूलभूत समस्यांच्या वाढतच असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर धरणगाव जागृत जनमंचने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारींकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील धरणगाव जागृत जनचे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी केली आहे.
धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे जळगाव जिल्हा नगरपालिका प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभारासोबत नगरपालिकेच्या प्रशासकपदी देखील त्यांची नियुक्ती आहे. त्यामुळे धरणगाव नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून त्यांना धरणगाव शहराकडे वेळ देणे शक्य होत नाहीय किंवा जाणीवपूर्वक धरणगाव शहराकडे मुख्याधिकारी जनार्दन पवार हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील धरणगाव जन जागृत मंचने केला आहे. म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी किंवा मुख्याधिकारी या दोघांपैकी एका पदाचा कार्यभार जनार्दन पवार यांच्याकडून काढून घेण्याची मागणी देखील धरणगाव जनजागृत जन मंचचे जितेंद्र महाजन यांनी केली आहे.