जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दिनांक १ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferance) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.