मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकांवर आज सुनावणी होती यावेळी कोर्टाने भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दहा लाख रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. सदर याचिका ही आवाजी मतदानाला आव्हान देणारी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने महाजन यांना १० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. सोमवारी, ७ मार्चपर्यंत १० लाख, त्यानंतर उच्च न्यायालय मंगळवारी ८ मार्च रोजी याचिकेवर सुनावणी घेईल. दरम्यान, भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने १० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या नियमदुरुस्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा या याचिकेवर राज्य सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे जनक व्यास आणि आमदार गिरीश महाजन यांच्या जनहित याचिका सुनावणी योग्य नाहीत असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी त्यांची जनहित याचिका ऐकण्यासाठी १० लाखांची पूर्वअट घातली आहे.