फैजपूर (प्रतिनिधी) गोवर्धन रुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन या पर्वतावर वृक्ष संवर्धन, जलसंधारण आदी कामे करून शरण जावे व हाच सातपुडा गोवर्धनाप्रमाणेच आपले रक्षण करण्यास समर्थ असल्याच आशीर्वचन आज गोवर्धन पूजेच्या प्रसंगी महामंडलेशवर जनार्दन हरिजि महाराज यांनी तपस्थळी जागृत दत्त देवस्थान, डोंगरदे येथे आयोजित गोवर्धन पूजेप्रसंगी केले यावेळी स्वामी स्वरूपानंद महाराज, गुरव महाराज व भक्तगण उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गोकुळात अतिवृष्टी व दुष्काळाच्या तिव्रतेमुळे गोकुळ वासीयांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समस्त गोकुळ वासीयांना गोवर्धन पर्वतास शरण जाण्याचा उपदेश केला, मानवी जीवनावर येणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पर्वतराज नेहमी सक्षम ठरल्याची शिकवण आपल्या संस्कृतीत आपल्याला मिळालेली असून त्याप्रमाणेच आज आपल्यावर येणाऱ्या दुष्काळ, पाऊस न येणे आदी सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्या गोवर्धनरुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन येथे जलसंधारण, वृक्षारोपण आदी कामे केल्यास हाच सातपुडा आपल्या परिसरास सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यास सक्षम आहे. तसेच पुढील वर्षांपासून या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प समस्त नागरिकांनी करावा असे महाराजांनी आशीर्वाचनात महाराजांनी नमूद केले. प्रसंगी जनार्दन हरिजी महाराज व स्वरूपानंद महाराज यांचे हस्ते पर्वतराजाची आरती करून ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले.