TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली : नाईक कुटुंबियांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारनेच दाबल्याचा थेट आरोप नाइक कुटुंबियांनी गुरुवारी केला आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली.

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून CDR दिला जातो. मग आम्हाला तसा CDR का मिळाला नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या मुलीने केला. आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बिलकूल दाद दिली नाही’

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला. आशियातील श्रीमंत व्यक्तीला ज्या वेगाने न्याय मिळतो तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना मिळणार नाही का, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नीने उपस्थित केला.

एखाद्या प्रकरणाचा निकाल विधानसभेतच लावायचा असेल तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालायाची गरजच काय, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला. त्यांचा रोख मनसुख हिरेन प्रकरणाच्या दिशेने होता. मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळ फासलं गेलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र, ते विधानसभेत खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत.

आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत – नाईक कुटुंबीय

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाहेर आले तेव्हापासूनच आम्हाला धमक्या मिळत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मला व्यवसाय करू देणार नाही अशा धमक्या मिळत होत्या. आता मात्र जीवे मारण्याच्याही धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत असा दावा अन्वय नाईक यांच्या मुलीने केला आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यावर सर्व यंत्रणा सक्रिय होतात. पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्यावर फडणवीस सरकारच्या काळात कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या कमेंट सोशल मीडियावर करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपी त्याच्या चॅनेलवरुन खुलेआम आम्हाला धमक्या देतो. मग महिला दिनाच्या दिवशी स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनी घेतली कोरोना लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करणाऱ्या संशयीताला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

July 16, 2024

धरणगाव नगरपरिषदतर्फे फिरते कोरोना चाचणी पथकाचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 20, 2021

“लोकांना खूश करणे माझं काम नाही” : मिताली राज

July 5, 2021

नरहरी जिरवळ कामकाज सांभाळताय ; राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group