धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भवरखेडा येथील बेलदार कॉम्प्लेक्स माऊली मेन्स पार्लर येथून एका तरुणाच्या मोटार सायकलच्या हॅन्डलला लावलेल्या पिशवीतून 40 हजार रुपये रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकरी सचिन रामलाल पाटील (वय ३३ वर्षे) हे दि ३०/०१/२०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास बेलदार कॉम्पलेक्स येथील माऊली मेन्स पार्लर येथे असताना त्यांच्या मोटरसायकलच्या हॅन्डलला लावलेल्या पिशवीतून एका अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये रोकड चोरी केली. सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करिम सैय्यद करीत आहे.