धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव व एरंडोल तालुका कृ. उ.बाजार समितीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे पॅनल निवडून आलेले आहे. लताताई गजानन पाटील व संजय पवार यांनी सभापती व उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील सभापती पदासाठी तर शिवसेनेचे किरण पाटील उपसभापतीपदी बिनविरोध निवडुन आले.
महायुतीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय पवार, भाजपचे नेते सुभाषअण्णा पाटील, पी.सी.आबा पाटील, डी.जी.पाटील साहेब, चंद्रशेखरदादा अत्तरदे यांनी सर्व संचालकांना केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जि. प.सदस्य प्रतापराव पाटील, पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, जिल्हाउपाध्यक्ष ऍड. संजयभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डी. ओ.नाना पाटील यांच्यासह महायुतीचे ग्रामपंचायत सदस्य,पं. समिती सदस्य,वि.का. सोसायटी संचालक, नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित होते.