धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने लसीकरण शिबीर मारोती मंदिर, सोनवद रोड, संजय नगर भागात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे विभागीय संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे व जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटील यांनी भेट दिली.
शिबीराचे उदघाटन
भिका ओंकार माळी (जेष्ठ माळी समाज पंच), पंढरीनाथ सखाराम महाजन (माळी समाज सेवक), सुनिल पंढरीनाथ चौधरी (तेली समाज अध्यक्ष), रवींद्र शिवदास निकम (नाभिक समाज सेवक), अण्णा महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन व भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी समाज बांधव उपस्थित होते.
शिबीराचे आयोजन
समाधान पाटील, भूषण महाजन, विक्की महाजन, गोपाल महाजन, कृष्णा महाजन, अमोल महाजन यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित भाजप पदाधिकारी
जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलालआप्पा महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, भालचंद्र माळी, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, जुलाल भोई, विजय महाजन, अनिल महाजन, राजू महाजन, सचिन पाटील, सुधाकर साळुंखे, विशाल महाजन, रवी महाजन आदी उपस्थित होते.