धरणगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज धरणगाव तालुका भाजपातर्फे निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आज धरणगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमुल कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या राज्यभर हिंसाचार व सुडाचे राजकारण सुरु आहे. ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉग्रेसचे गुंड हल्ले करीत आहे. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, घराची व दुकानाची जाळपोळ करणे, असे प्रकार घडत आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे स्त्रियांवर बलात्काराचा सुद्धा घटना घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या रक्तरंजीत हिंसाचाराच्या धरणगाव तालुका भारतीय जनता पार्टी निदर्शने करीत तीव्र शब्दात निषेध केला आहे.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिरीषआप्पा बयस, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड.वसंतराव भोलाने, प्रकाशदादा सोनवणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, ता. सरचिटणीस सुनील पाटील, सुनील चौधरी, राजु महाजन, जुलाल भोई, विजय महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, विक्की महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.