धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संवाद यात्रानिमित्त धरणगाव शहराला भेट दिली. यावेळेस धरणगाव तालुका काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत करण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ढोल ताशे तसेच फटाक्यांचा आतिषबाजीने नाना पटोले यांचे स्वागत करण्यात आले. नाना पटोलेंच आगमन नियोजित वेळेच्या दोन तास उशीर झाला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांचा या संवाद यात्रेचा भेटीने धरणगाव तालुका काँग्रेसमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले. प्रथम नाना पटोलेंनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण केले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जि.पाटील यांच्या हस्ते पटोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळेस आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, आखिल भारतीय काँग्रेस किसान सेल उपाध्यक्ष शाम पांडे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आश्विनीताई बोरस्ते, प्रमोद मोरे व बाळासाहेब पवार यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नाना पटोलेंनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काळे कृषी कायदे, पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी तसेच कोरोना काळात अपयशी झालेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नाना साहेबाचं भाषण सुरु असतांना ऍम्बुलन्सला जाण्यासाठी कार्यकर्त्यांना व पोलिसांना जागा करून देण्यास सांगितले व तोपर्यन्त आपले भाषण थांबवले. कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यांनी मनोबल उंचावलें व पक्षासाठी झोकून देऊन काम करा असा सल्ला दिला.
यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी.जि.पाटील, जेष्ठ नेते सुरेश भागवत, नीलकंठ पाटील, धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस सम्राट परिहार, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, गुलाब बापू पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुरेशसिंग चव्हाण, ध्रुवसिंग बिसेन, डॉ.व्ही.डी.पाटील, उपाध्यक्ष चंदन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुणाताई कंखरे, महिला काँग्रेस अध्यक्ष चारुशीला पाटील, विजय जनकवार, मनोज कंखरे, नंदलाल महाजन, महेश पवार, दीपक जाधव, सलीम मिस्तरी, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, बापू जाधव, सुनील बडगुजर, गोपाल पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, प्रमोद जगताप, योगेश येवले, रवी महाजन, सुनील महाजन, संतोष महाजन, सादिक शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
















