TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : गंदा हैं…पर धंदा हैं ये…!

बनावट मद्य तस्करांसोबत एकत्र आले होते गुटखा माफिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर आता अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. त्यानुसार ‘गंदा हैं…पर धंदा हैं ये’…म्हणत गुटखा माफिया आणि बनावट मद्य तस्कर या दोघं टोळींनी एकत्र येत धंदा वाढवायला सुरुवात केली होती. परंतू धंदा वाढणार तेवढ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापेमारी केल्यामुळे दोघं टोळ्या बिथरून गेल्या आहेत.

गुटखा माफियांसोबत एकत्र आले बनावट मद्य तस्कर !
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त करण्याआधी शहरातील दोन टोळ्या एकत्र आल्या होत्या, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यानुसार बनावट मद्य बनविल्यानंतर मालच्या तस्करीची जबाबदारी स्थानिक गुटखा माफियांकडे होती. अर्थात बनावट मद्य तस्कर आणि गुटखा माफिया या दोघं टोळींनी एकत्र येत काही दिवसांपासून पार्टनरशिपमध्ये हा गोरखधंदा सुरु केला अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या घरात बनावट दारू बनवली जात होती, ते घर भाड्याने देण्यासाठी शहरातील गुटखा माफियांनीच घर मालकाला तयार केले होते, अशी देखील चर्चा सुरु आहे.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

पार्टनरशिपमध्ये सुरु होता गोरखधंदा

शहरात मागील दोन वर्षापासून बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरु होता. परंतू स्थानिक पातळीवर हे बनावट मद्य विकले जात नव्हते. त्यामुळे गावात पाहिजे तशी चर्चा होत नव्हती. परंतू काही महिन्यांपूर्वी बनावट मद्य कारखान्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला टीप दिली जात होती. त्यामुळे धंदा करणे कठीण झाले होते. एवढेच नव्हे तर पाण्याच्या जारच्या नावाखाली सुरु असलेला उद्योग अनेकांना कळून चुकला होता. त्यामुळे जुन्या ठिकाणी धंदा करणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे आता धंदा पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिकसह राजकीय पाठबळ आवश्यक असल्यामुळे दारू तस्करांनी गुटखा माफियांसोबत पार्टनरशिप केली आणि काही दिवसांपासून बंद पडलेला हा गोरखधंदा पुन्हा सुरु झाला.

एका टोळीकडे माल बनविण्याची तर दुसरीकडे होती पोहचवण्याची जबबादारी

बनावट मद्य तस्करीत गुटख्यापेक्षा अधिक पटीने नफा असल्यामुळे दोघं टोळ्या एकत्र आल्या. एवढेच नव्हे तर गुटख्यासोबत आता बनावट मद्य देखील विक्री होत होते. दोघं टोळींनी आपापले काम विभागून घेतले होते. त्यानुसार बनावट दारू बनविण्याची जबाबदारी एका टोळीकडे तर दुसऱ्या टोळीकडे माल पाहिजे त्या ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी होती. बनावट मद्य धुळे, नंदुरबार परिसरात विक्रीसाठी जात होता. तर दुसरीकडे मध्य प्रदेशकडून गुटखा धरणगावात येत होता. थोडक्यात गावात बनलेली बनावट दारू बाहेर जिल्ह्यात तर दुसऱ्या राज्यातून आलेला गुटखा धरणगावात येत होता. ज्यापद्धतीने ट्रकभरून दारू बाहेर जाट होता. त्याचपद्धतीने कंटेनरभरून गुटखा धरणगावात खाली होत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

धुळे गारठलं ! ६.८ अंश सेल्सिअस निच्‍चांकी तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्याना शस्त्रक्रिएच्या दिलेल्या परवानगीच्या विरोधात आयएमएचा शुक्रवार देशव्यापी बंद

December 10, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ७ जुलै २०२३ !

July 7, 2023

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

May 21, 2022

धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती कच्चा घराला भेट ; आज लाभार्थ्याला मिळाले पक्के घरकुल

April 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group