TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती कच्चा घराला भेट ; आज लाभार्थ्याला मिळाले पक्के घरकुल

vijay waghmare by vijay waghmare
April 3, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी सौ. अर्चना मोरे, तहसीलदार श्री. सोनवणे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात सौ. जिजाबाई शंकर पाटील यांना घरकुल देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

त्याअनुषंगाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. राजू लोखंडे यांनी तातडीने कार्यवाही करून राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून दिले. योजनेच्या निकषांनुसार घरकुल उभारणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य वेळेत उपलब्ध करून दिले गेले, त्यामुळे घरकुलाचे काम लवकर पूर्ण झाले.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

घरकुलामुळे लाभार्थ्याचा आनंद
मोदी आवास योजनेच्या माध्यमातून उभारलेले घर पूर्ण झाल्यानंतर सौ. जिजाबाई शंकर पाटील यांनी शासनाचे आभार मानले. “जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आणि आम्हाला हक्काचे घर मिळाले. यासाठी प्रशासनाने वेळेवर मदत केल्यामुळे आमचे स्वप्न साकार झाले,” असे त्या म्हणाल्या.

स्थानिक प्रशासनाची तत्परता
गावातील पात्र लाभार्थ्यांना गृहसुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. घरकुल योजनेसाठी दिले जाणारे अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय योजना पूर्ण करता आली.

प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन
धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून घरकुल कामाला गती
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या घरकुलच्या कामावर स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्या गावोगावी दौरे करत आहेत. त्यामुळे यंत्रणेला गती आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुल पूर्ण होत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना अभिवादन !

December 12, 2022

बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

April 20, 2025

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

January 19, 2022

अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स, अरामको कंपन्यांची मात्र माघार

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group