TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

जळगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान जागर समितीतर्फे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की , सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान अस्तित्वात राहील संविधानाला हात लावण्याचा किंवा ते बदलून टाकण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी तो प्रयत्न भारतीय जनता हाणून पाडतील. सामान्यातल्या सामान्य जातीतल्या माणसाला राज्याचा मंत्री होता येत याचं सारं श्रेय भारतीय संविधानाला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. त्यांच्या प्रति आम्हा सर्वांची कृतज्ञता ही व्यक्त करणे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल सर यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार बापूराव पानपाटील यांनी मानले.
संविधान गौरव दिनाच्या निमित्ताची भूमिका विषद करताना मुकुंद सपकाळे यांनी संविधानावर होणारे धर्मांधतेचे हल्ले, जातीयतेचे व धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करणारे विचार हे संविधानाला अडचणीत आणत असल्याचे व या अशा प्रसंगी भारतीय जनतेने जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी भारतीय जनमानसाने संविधानाची खरी ओळख करून घेत राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी संविधानाचा आपल्या सोयीने वापर करून घेत आहेत आणि जनतेची दिशाभूल करत आहेत ही दिशाभूल जनता कदापी सहन करणार नाही आणि संविधानिक स्वरूपात अशा राज्यकर्त्यांना जनता उत्तर देईल. संविधानाचे संरक्षण, संविधानाची जबाबदारी आपल्या साऱ्या भारतीयांवर असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे सत्यशोधकी समाजाचे विचारवंत जयसिंग वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, मुस्लिम धर्माचे मुक्ती हारून यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले.
यांची होती प्रमुख उपस्थिती !
कार्यक्रमास माजी महापौर विष्णू भंगाळे, मुकुंद नन्नवरे, दिलीपभाऊ सपकाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फारुख शेख, अमोल कोल्हे, ऍड. राजेश झाल्टे, सरिता माळी, संदीप ढंढोरे, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, वाल्मीक जाधव, विनोद रंधे, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,ऍड. वाल्मीक सपकाळे, सतीश सूर्यवंशी, भारती बाविस्कर, माजी नगरसेवक राजू मोरे, श्रीकांत बाविस्कर, अशोक लाड वंजारी, नीलू इंगळे, भारती मस्के, सुजाता इंगळे, समाधान सोनवणे, भारत सोनवणे, सरोजिनी लभाने, दिलीप अहीरे, संजय सपकाळे, महेंद्र केदारे, किरण सोनवणे, सरपंच गोविंदा पवार, महेंद्र सोनवणे, जगदीश सपकाळे, रमेश सोनवणे, फारुख कादरी, माजी प्राचार्य एस. एस. राणे, ऍड. सलीम खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. या प्रसंगी संविधान जागर सायकल रॅलीचे मुकेश कुरील यांचा सत्कार मुकुंद सपकाळे, मुकुंद ननवरे यांच्या हस्ते करण्यात आला. संविधान सभेच्या नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान गौरव रॅली नेहरू चौक, टावर चौक, जुने बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येऊन रॅलीत अनेक स्त्री-पुरुषांचा प्रचंड संख्येने सहभाग होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

एरंडोलात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : गोव्याच्या सहलीत करंज येथील शेतकऱ्याचा मृत्यू !

November 10, 2021

पॉलिशच्या बहाण्याने महिलेच्या अंगावरील अडीच तोळ्यांचे दागिने लंपास !

October 20, 2024

जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ हजार ६४६ बाधित रुग्णांवर उपचार सुरू

April 7, 2021

‘पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…’ : कन्हैया कुमार यांचा हल्लाबोल

January 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group