
जळगाव (प्रतिनिधी) – येथील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये कारगील दिवस आणि राजर्षी शाहू जयंती निमित्त कवी संमेलन घेण्यात आले.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच आणि मुलनिवासी संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वरील कवी संमेलन घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी मुलनिवासी संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आर. जे. सुरवाडे व प्रमुख अतिथी बामसेफचे सक्रिय अध्यक्ष मा. संजय मोहिते तसेच माजी से.नि. प्रा. सुनिल गरुड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. रमेश साळवे यांनी केले. तर कविसंमेलनाचे सुत्रसंचलन कवी मनोहर गाढे यांनी केले.
बैठक व्यवस्था कवी ईश्वर वाघ यांनी सांभाळली.
उपस्थित कवींनी आपल्या काव्यरचनेतून सैनिकांचे शौर्य आणि शाहू महाराजांचे कार्य प्रणालीवर प्रकाश टाकला.
या प्रसंगी कवी शंकर भामेरे यांनी “जागर
आर. डी. कोळी यांनी “बाप किशोर नेवे यांनी “शाहू महाराज
संतोष साळवे यांनी
” रंजल्या गांजल्यांचा राजा रमेश साळवे यांनी “आंगन का धुवा बापुराव आकलकर यांनी ” शाहू चेतन घोडेस्वार यांनी ” शाहू बोधीसत्व अहिरे यांनी
” लोकशाही कविता सादर केल्या.
अरुणकुमार जोशी, कमलेश भिंगारे, सतीश चव्हाण यांनी ही कविता सादर केल्या.
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. संजय मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
कवी संतोष साळवे यांच्या कवितेची बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या
एफ. वाय. बी. ए.( प्रथम वर्ष कला) च्या अभ्यासक्रमात निवड झाल्याबद्दल अध्यक्ष आर. जे. सुरवाडे यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल वाघमारे, ईश्वर वाघ, रमेश साळवे, चेतन घोडेस्वार, राजेंद्र तायडे, कैलास पारधी, आबा बाविस्कर, मनोहर गाढे, आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.















