TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

चाळीस दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने केला घटनेचा उलगडा; बंदिस्त चारीतून मानवी सांगडा जप्त

vijay waghmare by vijay waghmare
September 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – साडूच्या वडीलांचे निधन झाल्याचे सांगत वैजयंती गणपत माळी (वय ८५, रा. करंजी, ता. पारोळा) या वृद्ध महिलेचा तीने मुलगा मानलेल्या बहिणीच्या मुलाने अपहरण करुन खून केला. त्यानंतर मृतदेह महामार्गालगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत विल्हेवाट लावली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून सुमारे चाळीस दिवस सलग या गुन्ह्याचा तपास करीत संशयित प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. धुळे) याच्या मुसक्या आवळून या गुन्ह्याचा उलगडा केला.

आपत्य नसल्याने पतीचे निधन झाल्यानंतर एकट्या राहत असलेल्या वैजयंताबाई माळी दि. ३ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाल्या. वृद्धेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने असल्याने त्यांचा घातपात संशय बळावल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी चार उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना केली. पहिल्या पथकाने संशयिताचा शोध घेण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी पारोळा, दळवेल, मुकटी, फागणे, धुळे व चाळीसगाव याठिकाणी संशयिताचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकावर बेपत्ता महिलेचा शोध घ्यायचा असल्याने त्यांनी सुमारे अडीचशे किमीचा प्रवास करीत तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

सीसीटीव्हीवरुन गवसला तपासाचा धागा

पोलिसांनी वैजयंताबाई माळी बेपत्ता झाल्या त्या दिवशीचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये वृद्धेने मुलगा मानलेला भाचा प्रशांत माळी हा अंगणात तिच्यासोबत बोलतांना दिसला. त्यानंतर वृद्ध महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून ती कार पारोळ्याच्या दिशेने जातांना दिसल्यानंतर पोलिसांना प्रशांतवर संशय बळावला. तसेच तो देखील गेल्या अनेक दिवसांपासून मिळून येत नसल्याने पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता.

कर्जामुळे दागिन्यांसाठी आवळला मावशीचा गळा

चाळीस दिवसानंतर पोलिसांनी संशयित प्रशांत माळी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला खाक्या दाखविताच त्याने त्याच्यावर असलेल्या कर्जामुळे आई समान असलेल्या मावशीचा तिच्याजवळील दागिन्यांसाठी रुमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. मावशीच्या अंगावरील दागिने त्याने
धरणगाव, अमळनेर व धुळे येथे विकले तर काही दागिने फागणे येथे लाविल्याचे पोलिसांना सांगितले असून पोलिस मुद्देमाल जप्त करत आहे.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे संतोष पवार, पोहेकॉ हिरालाल पाटील, विलेश सोनवणे, सलीत तडवी, राहुल बैसाने, विलास गायकवाड, राहुल कोळी, गोपाळ पाटील, मयुर निकम, बाबासाहेब पाटील, महेश सोमवंशी, रिझवान शेख, तांत्रिक विश्लेषण मिलींद जाधव, गौरव पाटील तर पारोळा पो. स्टे.चे निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक अमोल दुफळे, सुनिल हटकर, अनिल राठोड, सतिष पाटील, चेरसिंग मेहेर यांच्या पथकाने केली.

बंदिस्त चारीतून मानवी सांगाडा जप्त

संशयिताने विल्हेवाट लावलेल्या ठिकाणावरील सिमेंटच्या चारीतून पोलिसांनी मानवी सांगाडा मिळून आला. पोलिसांनी तो सांगाडा ताब्यात घेत तो जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, चाळीस दिवसांपासून सुरु असलेल्या घटनेचा उडलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

दुसऱ्या दिवशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

शिरसोली येथे नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगत वैजयंताबाई यांना प्रशांत माळीने (एमएच १९, बीजे ००७१) क्रमांकाच्या कारमध्य बसवले. दिवसभर त्यांना धरणगाव, अमळनेर, धुळेया मार्गावर फिरवल्यानंतर मावशीकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र त्यांनी दागिने देण्यास नकार दिल्याने मध्यरात्री दीड वाजता रागाच्या भरात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून तो घरी जावून झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने मृतदेहाची विल्टेवाट लावण्याकरीता दिवसभर फिरत होता, मात्र सायंकाळच्या सुमारास त्याने कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोड लगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत फेकून देत विल्हेवाट लावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAunt Strangled to Death for Jewelry

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मध्यरात्रीपासूनच अंधार, अनेक जिल्ह्यातील बत्तीगुल ; राज्य सरकारचा मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा !

January 4, 2023

बहिणीच्या बारशाच्या कार्यक्रमात भाजीच्या गंजात पडून भाजलेल्या चिमुकलीचा मृत्यू !

October 22, 2024

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी उघडणार लोकलचे दरवाजे; वडेट्टीवारांची घोषणा

December 24, 2020

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group