TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

गुन्हा दाखल होण्यापुर्वीच महिला घर सोडून पसार; रामानंद नगर पोलिसात गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे २० महिने लकी ड्रॉ (भीशी) मध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याचे अमिष दाखवित गिता निलेश दारा (रा. सरस्वती अपार्टमेंट, आदर्शनगर) या महिलेने २० जणांची २० लाख ८ हजार रुपयात फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर २०२४ ते मे २०२६ दरम्यान घडली. ही महिला अशाच पद्धतीने तीन वेगवेगळ्या पद्धतीने भिशी चालवित असल्याने तीने अनेक जणांना गंडविल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्यापुर्वीच ती महिला पसार झाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील टीएम नगरात राहणाऱ्या आयुषी दीपक बुटवाणी ( रा.टीएमनगर) यांचे सिंधी कॉलनीत रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. आदर्शनगरात राहणारी संशयित गिता दारा ही महिला त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होती. यावेळी त्या महिलेने बुटवाणी यांच्यासोबत ओळख करुन त्यांना भिशीतून चांगला परतावा मिळविण्याचे अमिष दाखवीत लकी ड्रॉ भिशीमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. गीता दारा ही महिला २०२४ पासून भिशी (चिट फंड) चालवत होती. बुटवाणीसह अनेक जणांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या सर्वांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून सप्टेंबर २०२४ पासून दरमहा नियमितपणे पैसे भरणे सुरू केले.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

भिशी भरणाऱ्यांऐवजी नातेवाईकांचाच लागला नंबर

२०२४ मध्ये सुरु झालेली लकी ड्रॉ ची ही भिशी मे २०२६
मध्ये पूर्ण होणार होती. मात्र, संपूर्ण मुदत संपत आली तरी भिशी भरणाऱ्या कोणत्याही सामान्य सदस्याचा नंबर लागलेला नव्हता. केवळ भिशी चालविणाऱ्या गीता हिचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचेच नंबर लकी ड्रॉ मध्ये निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सुरुवातीला टाळाटाळ नंतर पैसे देण्याची सांगितली तारीख भिशीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या सदस्यांनी ज्यावेळेस आपल्या हक्काचे पैसे व परतावा मागितला. तेव्हा गीता हिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गीताला फोन केला असता, तिचा नंबरही बंद येत होता. त्याचप्रमाणे काही वेळा संपर्क झाल्यानंतर दि. २६ जून, त्यानंतर दि. ३१ जुलै रोजी पैसे दिले जातील असे गीताकडून सांगण्यात आले होते.

भिशी संपण्याआधीच गीता फरार

भिशी चालविणाऱ्या संशयित गिता दारा यांच्याकडे गुंतवणुक करणाऱ्यांनी वारंवार पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांना पाठपुरावा करुनही भिशीतील रक्कम मिळत नव्हती. दरम्यान, भिशी काढणाऱ्या काही सदस्य २३ जुलै २०२६ रोजी सकाळी गीताच्या घरी गेले. मात्र, त्या ठिकाणी गीताच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले. तिचे दोन्ही मोबाईल फोनही बंद येत होता.

पैसे देण्यापुर्वीच महिला पसार

गुंतवणुक करणाऱ्यांनी गिता दारा हीच्या काही नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांनाही ती कोठे गेली, हे माहिती नव्हते, गीता फरार झाल्याचे समजताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली, या प्रकरणी दि. २९ जुलै रोजी आयुषी दीपक बुटवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गीता दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता हिने अशाच प्रकारे आणखीही काही भिश्या चालवल्या असून, तिने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२० जणांची झाली फसवणूक

गीताने चालविलेल्या भिशीतून २० जणांची फसवणूक झाली असून, यामध्ये ओम रविंद्र माळी (४० हजार), पुर्णिमा अनिल हसवानी (६८ हजार), मनोज दिगंबर चौधरी (२६ हजार), लक्ष्मी कारडा (४० हजार), पिंकी विजय हेमनानी (१ लाख ८ हजार), काजल संजय ललवाणी (५ लाख), चंद्रकांत रामदास जोशी (४० हजार), दिव्या भिमराव पवार (६० हजार), सुलक्षणा व शामकांत पवार (९८ हजार), निशा दिनेश ओचांनी (६० हजार), दिलीप कुमार तेओमलन (१ लाख), निलेश तुकाराम सोनवणे (२० हजार), सागर सुमित महाजन (१ लाख २८ हजार), सिमा सुनिल अडवाणी (२ लाख), सोनी दिपक घुगे (३० हजार), सविता विनोद हटकर (३० हजार), मीना राजु घुगे (३० हजार), मुस्कान वालेचा (१ लाख ७४ हजार), जय नरेश राजपाल (४० हजार), गजानन शंकर पाटील (२ लाख १३ हजार) यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman swindles ₹20 lakh by luring victims with investment in a lucky draw 'Bhishi' scheme

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवऱ्याची झाली पोलखोल; रस्त्यावर केली धुलाई

October 3, 2020

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल !

October 22, 2022

तीन दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या कारागिराने लांबवले नऊ लाखांचे दागिने !

January 21, 2024

राज्यसभा खासदारांच्या निलंबनावरून राहूल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले….

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group