धरणगाव (प्रतिनिधी) शहराचा पाणी प्रश्न सुटावा व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यात यावेत यासाठी धरणगाव जन जागृत जनमंचची स्थापन करीत असल्याची घोषणा मंचचे प्रमुख शिवराम पाटील यांनी केली आहे. त्यानुसार धरणगाव जन जागृत जनमंचची स्थापना दि. ०१ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
धरणगाव शहरात सुरु होत असलेल्या या जनमंचशी जुळण्यासाठी सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील या जनमंच मध्ये सामील व्हावे. सदर जनमंच हा सार्वजनिक असून नागरिकांच्या हितासाठी स्थापन करण्यात आला असून गैर राजकीय संघटन करून धरणगाव शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी याची स्थापना करण्यात येत आहे. ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्यांनी दि. ०१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्राम गृह येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील व जितेंद्र महाजन यांनी केले आहे.
धरणगाव जन जागृत जनमंच शी जुळण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण जनमंच च्या whats app ग्रुप मध्ये सामील होवू शकतात.
कृपया जे खरोखरच या लढाईत सामील होवू इच्छितात त्यांनीच ग्रुप मध्ये समावेश करावा.
https://chat.whatsapp.com/D6B7v6LGdN20NsyfYCIKKG