धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाणी शिवारात गिरणा नदीपात्रातुन वाळूची चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली असून धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात योगराज दगडू पाटील (४५, रा. आव्हाणी ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पो कॉ जितेश सुभाष नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ एप्रिल २०२२ रोजी आव्हाणी शिवारात गिरणा नदीपात्रातुन योगराज दगडू पाटील (४५, रा. आव्हाणी ता. धरणगाव) यांनी काही एक कारण नसतांना स्वराज्य ७४४ कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर एम.एच. १९ नंबर खोडलेला व ट्रॉली बिना नंबरची, जुनी वापरती ट्रॉलीत ४००० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू (गौणखनिज) चोरी केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात योगराज दगडू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ विजय सिताराम चौधरी करीत आहेत.