धरणगाव प्रतिनिधी – नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचा तातडीने निराकरण व्हावे यासाठी व्हॉट्सॲप नंबर सुरू करण्यात आला आहे. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व त्याद्वारे प्राप्त तक्रारींचे नगरपरिषदेमार्फत निराकारण करण्यात येत आहे.
त्याच धर्तीवर दिनांक ०८ जुलै २०२५ ते १४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये सकाळ सत्र व दुपार सत्र अशा दोन सत्रामध्ये “नगरपरिषद आपल्या दारी” या अभियान अंतर्गत शहरात विविध भागात “समाधान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये नागरिकांच्या विविध तक्रारी, समस्यांचे निवारण, नगरपरिषदेशी संबंधित विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे.तसेच कर भरणा करण्याची सुविधा तसेच महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील थकीत व्याज, दंड, शास्ती यांच्या रककमेवर सूट देण्यासाठी “अभय योजना” लागू केलेली आहे.त्याबाबत अर्ज भरणे, प्रधानमंत्री आवास योजना अर्ज भरणे यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.सदर अभियान शहरात परिहार चौक, मशीद अली, संजय नगर, गाबानंद चौक, बालाजी मंदिर परीसर, बजरंग चौक, मातोश्री नगर, नेहरू नगर, मोठा माळी वाडा, झुमकराम वाचनालय इत्यादी ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.