धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी शिक्षण गंगा पी आर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला.
मराठी राज गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली धरणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा उद्धव डमाळे पर्यवेक्षक मा के आर वाघ सर डॉ वैशाली गालापुरे, एस.पी तावडे यांचें शुभहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करत माल्यार्पण केले. याप्रसंगी मराठी राजभाषा व वि. वा. शिरवाडकर यांच्या बद्दलची माहिती शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस पी तावडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.डॉ गालापुरे यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहासासह मराठीतील बारकावे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सिंह सूर्यवंशी, मेजर डी.एस. पाटील सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन के.आर. वाघ सरांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील एस.पी. सोनार, व्हि.एच. चौधरी, डी.एच. कोळी, एम.व्हि. पाठक. पी.जी. पाटील यांनी अनमोल सहकार्य केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.