धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आपला गट, गण कोणत्या आरक्षणात मोडतो, याकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, थोड्यावेळापूर्वी धरणगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या ८ गणसाठीचे आरक्षण निघाले आहे.
धरणगाव तालुक्यातील पंचायत समिती गणसाठीचे आरक्षण निघाले आहे. त्यानुसार बांभोरी प्रचा. – एस्सी महिला, पाळधी खुर्द- एसटी महिला, बोरगाव-बांभोरी बु.- एसटी महिला/ पुरुष, चांदसर- नागरिकांचा मागासवर्गीय पुरुष (ओबीसी), नांदेड – सर्वसाधारण, साळवा-सर्वसाधारण, पिंप्री- सर्वसाधारण, वराड-सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आणि तहसीलदार नितीनकुमार देवरे उपस्थित होते. दरम्यान, आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता उमेदवार खऱ्या अर्थाने तयारीला लागणार आहेत.