धरणगाव (प्रतिनिधी) त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती शहरात उमटले असून सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
∆ सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, माहिती, पोस्टर सोशल मीडियावर टाकू नये.
∆ लोकसमूह, गट समूहाने एकत्र येणे टाळावे, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.
∆ गल्ली, मोहल्ला, नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये.
∆ कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती पसरवू नये. फॉरवर्ड करू नये.
∆ नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपमाहिती अपप्रचार यावर विश्वास ठेवू नये
∆ प्रत्येक नागरिकांनी सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
∆ अफवा पसरवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
∆ प्रत्येक नागरिकांनी सामंजस्याची समन्वयाची भूमिका घ्यावी व शांतता कायम ठेवावी.
∆ सामाजिक एकता, एकोपा, शांतता कायम रहावी यासाठी प्रयत्न करावेत.
∆ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी पोलिस प्रशासनाला तत्पर माहिती द्यावी.
∆ कोठेही अनुचित प्रकार, हिंसा, तेढ निर्माण होत असल्यास पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी.