धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने येथील शरद पाटील यांनी नुकताच शिंदे गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश केला आहे.
निशाने येथील रहिवासी ग्रामपंचायत सदस्य तथा जळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पाटील यांनी नुकताच मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांच्या बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थिती शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार आहे. शरद पाटील यांच्या प्रवेशाने अनेक युवा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळ फार मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या शिवसेना प्रवेश करणार आहेत. धरणगाव तालुक्यात जळगाव ग्रामीणमध्ये कापसाचे व्यापारामुळे शरद पाटील यांचा मोठा संपर्क आहे. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे नेते पी.एम. पाटील, तिळवण तेली समाजाचे, बाळासाहेब शिवसेनेचे पदाधिकारी हेमंत चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, तालुका उपप्रमुख मोतीअप्पा पाटील, सोनवदचे ग्रामपंचायत सदस्य बबलू पाटील, आबा महाजन, निलेश पाटील, गुलाबराव पाटील साहेब यांचे स्वीय सहायक गोविंद पाटील, एकनाथ माळी आदी मान्यवर उपस्थित होते.