धरणगाव (प्रतिनिधी) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना जिल्हा उपप्रमुख योगेश वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाच्या योगेश वाघ यांच्या निमित्ताने ‘युवा वाघ’ शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे आगामी काळात मोठा माळीवाडा परिसरातील राजकीय समीकरण बऱ्यापैकी बदलणार असल्याची चर्चा आहे.
धरणगाव येथे दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना जिल्हा उपप्रमुख योगेश वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यात प्रामुख्याने उपतालुका प्रमुख भरत भाऊ महाजन,परीट समाजाचे जिल्ह्याचे नेते छोटू भाऊ जाधव यांच्यासह हिरालाल महाजन, महेंद्र महाजन,सतीश गायकवाड,राजेंद्र पाटील, अण्णा महाजन,शिवा चौधरी,संजय मोरावकर, शेख नुरा शेखवजीर, नाना महाजन,चंदू चौधरी,मोहम्मद साबीर, दीपक महाजन,सागर विसावे,राकेश महाजन, आनंदा पवार,गणेश विसावे,गोरख विसावे, मंगल चव्हाण,मच्छिंद्र चव्हाण,महेश पवार, हिरालाल विसावे,राजू पारधी,समाधान चव्हाण, रिंकू महाजन,मंगेश महाजन,सुनील पारधी, प्रेमराज महाजन,महेंद्र महाजन,राहुल चव्हाण, सागर चव्हाण,दीपक मराठे,आत्माराम चव्हाण, सागर पारधी,दादू महाजन,गंगाराम पारधी, पप्पू पारधी,प्रवीण पारधी,पंकज पारधी, आकाश पारधी,किरण पारधी,भरत महाजन, याकूब पठाण,दीपक पारधी आदी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, योगेश वाघ यांच्या प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर त्यावर शनिवारी पूर्ण विराम मिळाला. योगेश वाघ यांच्या प्रवेशामुळे मोठा माळीवाडा परिसरातील राजकीय समीकरण बऱ्यापैकी बदलणार असल्याची चर्चा आहे. कारण योगेश वाघ यांचे नातेगोते परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीची गणितं देखील आता पूर्णपणे बदलतील असे देखील बोलले जात आहे. म्हणूनच योगेश वाघ यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.