TheClearNews.Com
Friday, December 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : मिस्त्री काम करणाऱ्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले ; मुलाची मोठ्या संघर्षातून PSI पदाला गवसणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) परिस्थितीशी दोन हात केले तर यश आपोआप मिळतं असं म्हटलं जातं. याचचं एक आदर्श उदाहरण धरणगाव तालुक्यातील शेरी गावातील राहुल अशोक बेलदार या तरुणानं घालून दिलंय. वडिलांसोबत मिस्त्री काम करून प्रवासात, घरी वेळ मिळेल तिथं अभ्यास करून चौथ्या प्रयत्नात राहुलने अखेर मोठ्या संघर्षातून पीएसआय पदाला गवसणी घातलीच. मग काय गावकऱ्यांच्या आनंदालाही पारा उरला नाही. त्यांनी गावातून राहुलची जंगी मिरवणूकच काढली.

अगदी प्रतिकूल परिस्थितीत राहुलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घरात साधा टीव्ही देखील नाही. बालपणापासून वेगवेगळ्या गावातील शाळेत शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली. धरणगाव आयटीआयमधून डीझेल मॅकनिकचा डिप्लोमा पूर्ण केला. तत्पूर्वी त्याने शेरी, बोराडी (शिरपूर), पथराड, चांदसर, धरणगाव अशा वेगवेगळ्या गावातून राहुलने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

READ ALSO

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

राहुलचे वडील मिस्त्री काम करतात. राहुलनेही अनेक वर्ष वडिलांसोबत गवंडी काम केलं. एकेदिवशी दीपस्तंभ कार्यक्रमात नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचे भाषण ऐकलं आणि आपणही अधिकारी व्हायचं असं राहुलने ठरवले. या कार्यक्रमानेच खऱ्या अर्थाने राहुलच्या जीवनाची दिशाच बदलवून टाकली. त्यानं काही मित्रांसोबत जळगाव गाठलं, अभ्यासिका लावली. पण परिस्थिती बेताची असल्यामुळे जेवण आणि राहण्याचा खर्च पेलवत नव्हता. शेरी गावातील एकाने सुचवलं की, तुमच्या सर्वांचे डब्बे गावातून जळगाव दररोज येणारा कुणीही घेऊन येत जाईल. राहुलसह त्याच्या मित्रांनी मग आपसात डब्बे आणायची ड्युटी आपसात वाटून घेतली. सकाळ, दुपार आणि रात्रीचाही डबा एकाच वेळी यायचा.

थोडे दिवस अभ्यास केल्यानंतर राहुलने एमपीएससी परीक्षा दिली आणि मंत्रालयात क्लार्क म्हणून नौकरीला लागला. पण आई-वडिलांना विश्वासच बसेना. बिना पैसे भरल्याशिवाय मुलाला चक्क मंत्रालयात कशी नौकरी लागेल?, असं त्यांना वाटायचं. पण थोड्या दिवसांनी विश्वास बसला. नंतरच्या काळात त्याचं लग्न झालं एक मुलगाही झाला. परंतू राहुलला मात्र पीएसआय व्हायचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे मुंबईला मंत्रालयात नौकरी करत असताना लोकलमधून प्रवासादरम्यान, राहुलने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. युट्युबवर अभ्यासक्रमाशी निगडीत व्हिडीओ बघू लागला. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आले मात्र, राहुल खचला नाही. चौथ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातलीच. पीएसआयचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सोहळा बघण्यासाठी नाशिकच्या ट्रेनिंगसेंटरला आल्यावर परिसर बघूनच राहुलचे आई-वडील आवक् झाले. त्यानंतर मुलाला परेड करतांना बघून दोघांनाही गहिवरून आले. तर माझ्या पठ्ठ्यानं करून दाखवलं…जिंकून दाखवल्याची चमक राहुलच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये स्पष्ट दिसून येत होती.

दरम्यान, आई-वडील मोठे भाऊ आणि काकांच्या मेहनतीने, आशिर्वादाने आपण इथपर्यंत पोहचू शकलो, असं राहुल नम्रपणे सांगतो. आता भविष्यात गरीब लोकांना कसा न्याय देता येईल, माझ्यासारखी ज्यांची परिस्थिती हलाकीची आहे, त्यांना कशी मदत करता येईल, याकडे मी लक्ष देईल. तसेच माझे लक्ष डीवायएसपी पदावर असून जसं-जसा वेळ मिळेल तसा मी पुन्हा अभ्यास करणार असल्याचेही राहुल म्हणतो. तसेच गावकऱ्यांनी माझी काढलेली जंगी मिरवणूक आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील, एवढेच नव्हे तर गावातील इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल, असेही राहुल म्हणाला. गावकऱ्यांनी काढलेल्या मिरवणूकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी देखील राहुलचा संघर्ष आणि त्याच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
जळगाव

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

December 12, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 डिसेंबर 2025 !

December 12, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 डिसेंबर 2025 !

December 11, 2025
धरणगाव

जागतिक एड्स दिन पंधरवडा : धरणगाव येथे जनजागृती व तपासणी अभियान संपन्न

December 10, 2025
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ८ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : चहाच्या टपरीत ठेवलेली १ लाख ७५ हजाराची बॅग चोरट्याने लांबविली !

June 3, 2022

पेट्रोल-डिझेलचा भाव ; सलग सहाव्या दिवशी इंधन दरात वाढ !

February 14, 2021

Bhr Scam : खंडणीचा गुन्हा पुण्याहून चाळीसगाव पोलिसांकडे हस्तांतरित !

January 18, 2023

जिल्हा रुग्णालयातील चार एसी काढले ; दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्याला यश !

March 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group