धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी बु. येथील कृषी केंद्र अज्ञात चोरट्याने फोडून रोकडसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, भूषण संजय पाटील (वय २९, रा. बांभोरी बु. ता. धरणगाव) यांचे गावात शेतकरी नामक कृषी केंद्राचे दुकान आहे. दुकानाला लागुनच गोडावून आहे. अज्ञात चोरट्याने २७ फेब्रुवारी रात्री ८ ते दि. २८ फेब्रुवारीच्या सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, शेतकरी कृषी केंद्र दुकानाचे मागील बाजुस असलेल्या गोडऊनच्या शटरचे कुलूप तोडून कोणीतरी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर बॉक्स आणि ७०० रुपये रोख असा एकूण ५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.ना. दिपक पाटील हे करीत आहेत.