धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि द्वितीय स्नेहसंमेलन कार्यक्रमात उत्कृष्ट असे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
सुकमल लॉन्स येथे सकाळी वार्षिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील सर होते. तर प्रमुख अतिथी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ए डी वळवी सर, पीएसआय संतोष पवार सर, सी. ओ. अर्बन बँक सुशील गुजराती सर, समाजसेवक सुनील चौधरी सर उपस्थित होते. यावेळी शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर, वाईस चेअरमन मालती ताई पवार मॅडम, प्राचार्य वैशाली नितीन पवार मॅडम उपस्थित होत्या.
गतवर्षी ज्या विविध स्पर्धा झाल्या त्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या प्राचार्य यांनी गतवर्षी शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा सांगितला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहजीब खाटीक मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली जैन मॅडम यांनी केले. संध्याकाळी एरंडोल रोडवरील सुकमल मंगल कार्यालयामध्ये शाळेचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी सिनेट सदस्य एन एम यू डी. आर. पाटील सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प.रा. हायस्कूल सोसायटीचे चेअरमन डॉ. ए.के. कुलकर्णी सर, सोसायटीचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे सर, सोसायटीचे संचालक अजय शेठ पगारिया, मा. नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, लोकमत रिपोर्टर भगीरथ माळी सर, मुस्ताक बोहरी सर, खुजेमा बोहरी मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य वैशाली नितीन पवार मॅडम आणि शाळेचे संचालक नितीन पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे शीर्षक भारत की सर असे ठेवण्यात आले होते गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर वृत्त सादर करून दाद मिळविले नृत्याचे दिग्दर्शन कल्याणी पाटील मॅडम यांनी केले.
कार्यक्रमास अतुल पवार सर, रूपाली पवार मॅडम, इंद्रजीत पाटील सर, हर्षल पाटील सर विराजमान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहजीब खाटीक मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी हितेश पवार, चैताली पवार, कृष्णा पवार, राजेश आफरे, स्नेहल भाटिया, उज्वल महाले, संकेत भंडारी, छाया पाटील मॅडम, सिमरन खाटीक मॅडम, मृणाली सोनवणे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम, शीला चौधरी मॅडम, वैशाली जैन मॅडम, पूजा चौधरी मॅडम, अंकिता पवार मॅडम, राधा भंडारी मॅडम, तीलोचना बडगुजर मॅडम, कमलेश्वरी मॅडम, माधुरी पाटील, राखी भागवत, कला वाणिज्य विज्ञान कॉलेजचे एनसीसी चे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.