धरणगाव (प्रतिनिधी) संततधार पावसाने शहरातील परीहार नगर समोरील मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असून यामुळे विद्यार्थी, नागरिकांसह वाहनधारकांचे हाल होत आहेत.
परीहार नगर समोर सोनवद रस्त्याचा दिवसभरातून हजारो नागरिक तसेच शाळा, कॉलेजमधील जाणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून वापर होत असतो. संततधार पाऊस तशात या रस्त्यावर पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे मोठ मोठे पडलेले आहेत. त्यामुळे पाणी साठत असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
















