धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कढरे व संजय पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी रवींद्र कढरे व संजय पवार यांचा पाळधी येथे ना. गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला. या सत्कार प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर,गटनेते पप्पू भावे,नगरसेवक विलास महाजन,मच्छिंद्र पाटील,वाल्मीक पाटील,प्रशांत देशमुख,बोरगावचे सरपंच दिनकर पाटील,चेतन पाटील,भैया पाटील, जि.प. सदस गोपाल चौधरी आदी उपस्थित होते. प्रवेशाबद्दल दोघांचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे,मागासवर्गीय तालुका प्रमुख नाना भालेराव,तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी अभिनंदन केले.