धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादा प्रमाणे यंदाही शहरातील संजय नगर भागात श्री दत्तात्रय जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी होम हवन जाप तर संध्याकाळी प.पु. राजयोगी धनराजनाथजी महाराज यांचे गायन व प्रवचनाचे कार्यक्रम संपन्न झालेत. या कार्यक्रमात भगवती स्वरूपा माताजी शंकुतला देवी भगवती स्वरूपा माताजी पुष्पा देवी, भगवती स्वरूपा माताजी रजनी देवी.प.पु.गुरूवर्य राजयोगी श्री सागरनाथजी यांनी आलेल्या भक्तगणांना मार्गदर्शन केले. दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजेपासून आलेल्या भक्तगणांनी दत्तात्रयांचे जाप (नामस्मरण) केले.
दुपारी १२:४५ वाजता श्री दत्तात्रयांचे महाआरती झाली. गादीपती धनराजनाथजी याचे अंग गणले गेलेले उत्तराधिकारी भगवती स्वरूपामा शकुनला देवी, भगवती स्वरूपा माताजी पुष्पा भगवती स्वरूपा माताजी रजनी देवी, प.पु.गुरुवर्य राजयोगी श्री सागरनाथजी यांचे आलेल्या हजारो भक्तगणांनी पुजा केली.
दुपारी १ पासून अन्नदानाचे (भंडारा) सुरू झाला. हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता, पराग गुरुबा, सागर जगताप, फकिरा मराठे कांतीलाल मराठे, डिगंबर चौधरी, पुरूतोत्तम चौधरी, जयंत पाटील, सुनिल जोशी, संदिप भावसार, राजु जाधव, भुला जाधव, विष्णू जाधव, क्रिष्णा वाघ, प्रकाश पेंटर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.