नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi PM Kisan Yojana) यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची (New Year 2022) भेट देत PM शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi 10th installment) योजनेचा १० वा हप्ता जारी केला आहे. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही यासाठी तुम्ही या मोबाईल नंबर आणि हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.
१० कोटी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले
मोदी सरकारने देशभरातील १०.०९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २०,९०० रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे. तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, तर तुम्ही या क्रमांकांवर तक्रार करू शकता.
नोंदणीकृत शेतकरी या क्रमांकावर तक्रार करू शकतात
अनेकांची नावे आधीच्या यादीत होती, मात्र नवीन यादीत नाही. मागच्या वेळी पैसे आले पण यावेळी आले नाहीत, तर तुम्ही पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.
याप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011 24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109