भिवंडी (वृत्तसंस्था) १६ वर्षीय अल्पवयीन अपंग मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अपंग असून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत या नराधम काकाने तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी नराधम काकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. भिवंडी तालुक्यातील एका गावात हि पीडित अपंग आणि अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासमवेत राहते. तर त्याच गावामध्ये तिचा नराधम काका देखील राहतो. थोड्या दिवसांपूर्वीच आरोपीने या मुलीवर बलात्कार केला होता. त्यामुळे पीडित सतत मानसिक तणावाखाली होती. घरच्यांनी तिची सखोल विचारपूस केली असता तिने घडला प्रकार सांगितला आणि अत्याचाराची घटना उजेडात आली. पीडितेच्या कुटुंबीयांनी लगेचच भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पिडीतेचे जबाब नोंदवून व वैद्यकीय तपासणी करून नराधम काकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.